ॲपलचा मोठा निर्णय : बेंगळुरूत १० वर्षांचा नवा ऑफिस करार!

जगप्रसिद्ध स्मार्टफोन उत्पादक ॲपल (Apple Inc.) ने भारतातील सर्वात मोठा आयटी हब मानल्या जाणाऱ्या बेंगळुरू येथे मोठी गुंतवणूक केली आहे. कंपनीने येथे आपले नवे कार्यालय सुरू करण्यासाठी १० वर्षांचा दीर्घकालीन लीज करार केला आहे.

या कराराअंतर्गत ॲपलला येत्या दशकात भाडे, पार्किंग आणि देखभाल शुल्क मिळून तब्बल ₹१,००० कोटींहून अधिक खर्च करावा लागणार आहे. यामुळे ॲपलचा भारतातील उपस्थिती आणखी मजबूत होणार असून, बेंगळुरूच्या आयटी सेक्टरला मोठा बूस्ट मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

का महत्त्वाचे?

भारतात ॲपलच्या उत्पादनांची मागणी झपाट्याने वाढत आहे.

कंपनीने आधीच आयफोन असेंब्लीसाठी फॉक्सकॉन, पेगाट्रॉनसारख्या भागीदार कंपन्यांद्वारे भारतात मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स सुरू केली आहेत.

आता कार्यालयीन पायाभूत सुविधा वाढवल्याने, भारतामध्ये ॲपलच्या बिझनेस विस्ताराला गती मिळेल.

अर्थव्यवस्थेवरील परिणाम

तज्ज्ञांच्या मते, या निर्णयामुळे भारतात IT व टेक-सेक्टरमध्ये आणखी रोजगाराच्या संधी निर्माण होतील. तसेच बेंगळुरूचे जागतिक गुंतवणूक केंद्र म्हणून स्थान अधिक मजबूत होणार आहे.

तुम्हाला का वाटतं, ॲपलचा हा पाऊल भारतामध्ये iPhone मॅन्युफॅक्चरिंग व गुंतवणूक वाढवण्यासाठी मोठा टप्पा ठरेल का? 🤔

Leave a comment