
पाक अधिकृत काश्मीर (POK) मध्ये सुरू असलेल्या तीव्र आंदोलनात नागरिकांनी पाकिस्तान सरकार आणि सुरक्षा दलांविरोधात अनोखा मार्ग अवलंबला आहे.
महागाई, बेरोजगारी आणि मूलभूत सुविधांचा अभाव यामुळे रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी पाकिस्तानी सुरक्षा दलांची गणवेश, हेल्मेट्स आणि शील्ड्स थेट १० रुपयांत विक्रीसाठी ठेवले.
➡️ यामुळे आंदोलनाला एक प्रतीकात्मक वळण मिळाले असून नागरिकांनी स्पष्ट संदेश दिला आहे की सुरक्षा दलांचा धाक, बळजबरी आणि दडपशाही आता मात्र थट्टा ठरत आहे.
📌 घडामोडींची पार्श्वभूमी:
गेल्या काही दिवसांपासून POK मध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन
सुरक्षादलांकडून लाठीचार्ज, दडपशाहीची कारवाई
प्रत्युत्तरादाखल नागरिकांकडून Symbolic Protest
सोशल मीडियावर आंदोलनाचे फोटो व व्हिडिओ जोरदार व्हायरल
या अनोख्या आंदोलनाने पाकिस्तान सरकारला आणि लष्कराला मोठा धक्का बसला आहे.